
हे आषाढीचे एक छोटेसे, साधे सरळ टास्क मॅनेजर आहे. वापरून पहा आणि प्रतिक्रीया द्या, सुधारणा सुचवा...
एक असे छोटेसे, सोपे टूल बनवायचे होते ज्यामुळे विवीध प्रकारची कामे लिस्ट करणे, फिल्टर करणे, त्यावरील अपडेट्स इ. सर्वाचा रेकॉर्ड मेंटेन करता येईल. ह्यासाठी अनेक ॲप आहेत खरे पण प्रत्येकाचे अनेक लिमीटेशन आहेत. सर्वात मोठे लिमीटेशन हे की काम दुसऱ्या कुणाला असाईन करायचे असेल आणि फॉलोअप घ्यायचा असेल तर ते काही होत नाही. घरापासून ऑफीसपर्यंत अनेक ठिकाणी ह्याची खरी गरज पडते. अनेक कामे अशी आहेत जी आपण दुसऱ्याला (बायको, आई/वडील, मित्र, सहकारी) असाईन करतो आणि मग त्याचा ट्रॅक ठेवणे खूपच कठीण जाते. अनेक गोष्टी विस्मृतीत जातात. जेव्हा आठवतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते..
मग हे असे एक टूल आपणच बनवले तर? ह्यावर बरेच काम केले. सारी कामे लिहून काढली. १५०-२०० कामांचा डेटाबेस बनवला. त्याचे अॅनालिसीस केले. हे बनवायचे तर कस्टम ॲप बनवायचे की रेडीमेड काही वापरायचे हा खूपच महत्वाचा निर्णय होता. शेवटी द्रुपाल वापरून हे बनवायचे ठरवले (का??). मग २-३ दिवस सातत्याने बसून अनेक प्रकारचे प्रयोग केले, कॉन्फिग केले आणि आता हे ॲप बऱ्यापैकी झाले आहे. अनेक नविन फीचर्स उपलब्ध आहेत आणि खूप सोपे केले आहे.
"आषाढी ToDo” हे आपली कामे लिस्ट करण्यासाठी, त्यावरील अपडेट्स मेंटेन करण्यासाठी आणि मुख्यत्वे दुसऱ्या कुणाला काम असाईन करून त्यावरील फॉलोअप घेण्यासाठी असे समावेशक वेबॲप आहे.