Skip to main content
सुविधा (Features)

सुविधा (Features)

"आषाढी ToDo” हे आपली कामे लिस्ट करण्यासाठी, त्यावरील अपडेट्स मेंटेन करण्यासाठी आणि मुख्यत्वे दुसऱ्या कुणाला काम असाईन करून त्यावरील फॉलोअप घेण्यासाठी असे समावेशक वेबॲप आहे. 

ह्या टूलच्या वापराने तुम्ही खालील गोष्टी करू शकता -

  1. आपली कामे लिस्ट करणे. कामाचे नुस्ते टायटल किंवा डिटेल्स सहित लिस्ट करणे शक्य आहे. एकदाच काय ती सारे कामे लिस्ट करा आणि वेळोवेळी अपडेट्स मेंटेन करा..
  2. कामे स्वत:ला किंवा इतर कुणाला असाईन करणे. ती व्यक्ती देखील ॲपवर सामील असणे अनिवार्य आहे. त्या व्यक्तीला डायरेक्टली ही असाईन झालेली कामे त्याच्या लिस्टमधे दिसतात. ह्यासाठी तुमच्या मित्र/सहकाऱ्यांना ह्या ॲपवर रजिस्टर करायला प्रवृत्त करा. सगळ्यांनाच ह्याचा फायदा आहे..
  3. कामांवर अपडेट्स देणे. आपण स्वत: आणि ज्याला काम असाईन केले असे दोघेही कामांवर अपडेट्स देऊ शकता. ह्याचा ट्रॅक राहतो. नविन अपडेट मिळाले की कामे हायलाईट होतात. अशाच प्रकारे दुसऱ्या कुणी आपल्याला काम असाईन केल्यास ते तुमच्या लिस्टमधे दिसते व त्यावर अपडेट देता येतात.
  4. पेंडींग कामे, झालेली कामे वेगवेगळी पाहता येतात. काम कधी झाले पूर्ण हे मार्क करता येते. तरीही रेकॉर्ड राहतो.
  5. कामांच्या ABC प्रायोरिटी सेट करता येतात. त्यानुसार कामे सॉर्ट होतात..
  6. कामांच्या विभागणीसाठी “प्रोजेक्ट” सेट करता येतात जसे की - पर्सनल, ऑफीस, आषाढी.. आणि प्रोजेक्ट निहाय कामे पाहता येतात.
  7. महत्वाच्या आणि वारंवार लागणाऱ्या माहिती “नोट्स” मधे ठेवू शकतो ज्या कुठूनही ॲक्सेस करता येतात.

ज्यांना विवीध प्रकारची कामे असतात किंवा दुसऱ्याकडून कामे करून घ्यायची असतात त्यांना खूप उपयुक्त आहे. कामाचे लिस्टींग आणि ट्रॅकींग करण्यासाठी. लवकरच ह्यामधे तारीख, शेड्यूल आणि जनरल कॅलेंडर देखील आणणार आहे. ह्याचा वापर करून कामांचे रेकॉर्ड ठेवू शकतोच पण कुणाकडून पैसे यायचे असतील तरी त्याचा रेकॉर्ड देखील ठेवू शकतो, गुंतवणूकीचे रेकॉर्ड ठेवू शकतो आणि इतर बरेच काही. ह्याचे रजिस्ट्रेशन फ्री आहे आणि गुगल अकाऊंट वापरून तुम्ही वन क्लिक डायरेक्ट रजिस्टर करू शकता/लॉगीन करू शकता. म्हणजे पासवर्ड वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. डेटा क्लाऊडमधे सेफ असतो, कुठेही उपलब्ध असतो.