- रजिस्ट्ररेशन लिंकवर क्लिक करा. फॉर्म भरून किंवा गुगल अकाऊंट वापरून रजिस्टर करू शकता.
- तुमच्यापुरते कामे लिस्ट करायची तर सोपे आहे. तुम्ही डायरेक्ट टास्कलिस्ट मधे कामे नोंदवू शकता. त्याचा फॉर्म एकदम सुलभ आहे. कामाचे नाव, तपशील, प्रायोरिटी इ. सारे लिस्ट करू शकता. काम असाईन करणे अनिवार्य आहे. त्यामुळे स्वत:ला काम असाईन करा. तुम्हाला “All Task” मधे सारी कामे दिसतात.
- दुसऱ्या कुणाला काम असाईन करायचे तर त्या व्यक्तीने देखील रजिस्टर करणे आवश्यक आहे. मग तुम्ही शेवटच्या टॅबवर जाऊन त्या व्यक्तीचे नाव शोधून त्याला कनेक्ट करू शकता. मग काम सेट करताना तुम्ही ते दुसऱ्याला असाईन करू शकता.
- अशाच प्रकारे कामांची विभागणी आणि फिल्टर करण्यासाठी "प्रोजेक्ट" सेट करू शकता आणि कामे लिस्ट करताना प्रोजेक्ट ठरवू शकता.
- कामे पेंडींग असतात. त्याच बटनावर क्लिक केले की काम “डन” होते. सारीच कामे किंवा पेंडींग/डन कामे फिल्टर करता येतात..
- कामावर क्लिक केले की सारे डिटेल्स दिसतात. त्यावर अपडेट्स देता येतात. एडीट करता येते. डिलीट करता येते.
अजूनही बरेच काही. वापरून पहा. सुधारणा सुचवा. काही चुकले असेल तर सांगा. अनुभव शेअर करा.